Breaking News

रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या रक्षाला सुवर्णपदक

पनवेल ः रामप्रहर वृत्त

नाशिक येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य उपज्युनियर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अंतर्गत योगेश पाटील बॅडमिंटन अकादमीच्या रक्षा कंदासामी हिने सुवर्णपदक पटकाविले आहे. नाशिक येथे उपज्युनियर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा झाली. या स्पर्धेत रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अंतर्गत योगेश पाटील बॅडमिंटन अकादमीच्या रक्षा कंदासामीने अंतिम फेरीत श्रावणी वाळेकरला 17-21, 21-18, 21-19 असे नमवून सुवर्णपदक जिंकले. तिला प्रशिक्षक योगेश पाटील, मलेशियाचे प्रशिक्षक हैरी व प्रशिक्षक राजेंद्र घरत यांचे मार्गदर्शन लाभले.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांचा विशेष …

Leave a Reply