पनवेल : रामप्रहर वृत्त
26 फेब्रुवारी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची पुण्यतिथी, 27 फेबु्रवारी हा मराठी राजभाषा दिन म्हणजेच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांची जयंती तसेच 28 फेब्रुवारी सर सी. व्ही. रमन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन हे तीन ही दिवस चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यमात एकत्रितपणे साजरे करण्यात आले. या कार्यक्रमात पर्यवेक्षिका निरजा मॅडम, मराठी विभागप्रमुख प्रकाश पांढरे तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख सुप्रिया ताम्हनकर, क्रिडा शिक्षक जितेकर, मराठी विषय विभागातील सर्व शिक्षक यांच्या हस्ते पूजन व दिप प्रज्वलन करण्यात आले. चैताली सुर्वे यांनी सूत्रसंचलन केले. वीर सावरकर यांच्या विषयी वैष्णव म्हात्रे या विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त केले. मराठी दिन विशेष जुही चव्हाण आणि श्रद्धा नाईक या दोन विद्यार्थीनींनी सांगितले. श्रावणी करणेकर या विद्यार्थीनीने विज्ञान दिनाचे महत्त्व विषद केले. स्नेहा पाटील यांनी समयोचित भाषण केले. पर्यवेक्षिका निरजा अदुरी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. दरवर्षी आम्ही हा समारंभ मोठ्या प्रमाणात साजरा करतो. परंतु या वर्षी कोविड – 19च्या सर्व नियमावलींचे पालन करून हा छोटेखानी समारंभ आम्ही साजरा केला, असे मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी सांगितले.