नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय इंग्रजी माध्यमात सोमवारी (दि. 21) इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना विमानतळाच्या प्रतिकृतीचे दर्शन घडवण्यात आले. हा उपक्रम स्वयं एक्झिबिटर्स या संस्थेतर्फे राबविण्यात आला. विमानतळाचे कामकाज कसे चालते, विमाने लॅण्ड कशी होतात, टेक ऑफ कसा घेतात विमानांना सिग्नल कसा मिळतो. डोमॅस्टीक आणि इंटरनॅशनल विमानतळ तसेच प्रवासी व मालवाहतूक विमाने यात कोणता फरक असतो? विमानाच्या प्रवासीसंख्येची मर्यादाकाय असते. विमानतळाची सुरक्षा कशी राखली जाते. इत्यादी बाबींचे विस्तृत ज्ञान या संस्थेचे संजय गावडे यांनी विद्यार्थ्यांना दिले. विमानतळांवर भविष्यात निर्माण होणार्या करिअरच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना जागृत करण्यात आले. साधारण 1200 विद्यार्थ्यांनी या सुसंधीचा लाभ घेतला विद्यालयातर्फे हे प्रदर्शन विद्यार्थ्यांना निशुल्क दाखविण्यात आले.