भाजप नेते अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

भानघर येथील वृद्धाश्रमात फळे, धान्याचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 22) विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. त्याअंतर्गत वाढदिवसानिमित्त भानघर येथील वृद्धाश्रमात फळे आणि धान्याचे वाटप करण्यात आले. भानघर येथे वृद्धाश्रमात शशिकांत दिसले यांच्याकडून धान्याचे वाटप तसेच मयूर कदम, अनिल कोकाटे व विश्वजीत पाटील यांच्याकडून फळांचे वाटप करण्यात आले. या वेळी भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, माजी उपमहापौर सीताताई पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुनील माळी, पनवेल तालुका युवा मोर्चा अध्यक्ष आनंद ढवळे, पनवेल भाजप युवा मोर्चा सरचिटणीस विश्वजीत पाटील,  सोशल मीडिया सेल संयोजक राजेश पाटील, शुभ पाटील, भाजप ओबीसी मोर्चा उत्तर रायगड सरचिणीस दशरथ म्हात्रे, माजी सरपंच शांताराम पोपेटा, उपसरपंच रोशन पोपेटा, संजोग पाटील, नारायण मढवी, अनिल कोकाटे, मयूर कदम, रोशन गायकवाड, अविनाश गायकवाड आदी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

Have you been on the e, utilizing the thrill off a genuine gambling enterprise sense?

Finest Crazy Go out Gambling establishment Web sites elizabeth Online Uk Do you really discover …

Leave a Reply