Saturday , December 3 2022

पनवेलमध्ये गोवर रोखण्यासाठी सज्जता

महापालिकेत तातडीची बैठक
पनेवल ः प्रतिनिधी
पनवेल महापालिका क्षेत्रात आढळणार्‍या गोवर रूबेला रूग्णांची संख्या लक्षात घेऊन महापालिका मुख्यालयात गुरुवारी (दि. 24) आयुक्त गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका कार्यक्षेत्रातील बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीच्या बैठकीत घेण्यात आली. गोवरचे रूग्ण मिळालेल्या परिसराचा सर्व्हे करणे, तसेच जनजागृती व लसीकरणावर भर देण्याच्या सूचना आयुक्तांनी वैद्यकिय अधिकार्‍यांना दिल्या.
या वेळी उपायुक्त सचिन पवार, प्रभारी मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. रेहाना मुजावर जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष समन्वयक अरूण काटकर, डॉ. अभय सेठी, डॉ. जॉय भांडारकर, डॉ. राहूल पेद्दावाड, डॉ. र्कितीक करे, डॉ. मंदार बद्रापूरकर, डॉ.विवेक गुप्ता, डॉ. स्वाती लिकीते, डॉ. तुषार जाधव, डॉ. विनय कमले, डॉ. प्रशांत गायकवाड, लसीकरण क्षेत्र सहनियंत्रक मोहन मुकादम, महापलिकेच्या सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी तसेच एएनएम,जीएनम, आशा वर्कर उपस्थित होत्या.
आत्तापर्यंत पनवेल महापालिका क्षेत्रात गोवरचे पाच रुग्ण आढळले असून 13 रुग्ण संशयित आहेत. यांच्या रक्तांचे नमुने तपासणीस पाठविले आहेत. गोवर रोग हा संसर्गजन्य रोग असला तरी ज्यांनी याचे डोस घेतले आहेत, त्यांच्यामध्ये याची तीव्रता कमी दिसते. त्यामुळे अजूनही ज्या मुलांचे गोवरचे डोस राहिले आहेत त्यांच्या पालकांनी आपल्या जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जावे. दर बुधवारी याठिकाणी गोवरची लस दिली जाते. याशिवाय आपल्या कार्यक्षेत्रात 300 ठिकाणी बाह्यलसीकरण सत्रे घेतली जातात. या लसीकरण सत्रांमध्ये देखील गोवरचा डोस दिला जातो.
घरामध्ये एखादा गोवर रूग्ण आल्यास त्यास सात दिवस आयसोलेशनमध्ये ठेवावे. गरज भासल्यास त्या त्या परिसरातील बालरोग तज्ज्ञाची मदत घेण्याविषयी वैद्यकिय अधिकार्‍यांना यावेळी सूचित करण्यात आले, तसेच गोवरसाठी महापालिकेच्या वतीने गोवरसाठी खास एक रूग्णवाहिका राखीव ठेवण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रातील गंभीर गोवरचे रूग्ण आढळल्यास त्यांनी मोफत रूग्णवाहिकेसाठी महापालिकेशी संपर्क करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

पनवेल महानगरपालिका हद्दीत गोवर आजाराचे काही संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्या रक्ताच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त तीन रुग्णांना गोवरची लागण झाली आहे. त्या मुळे पालकांनी आपल्या पाल्याची काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्या पाल्याला ताप येत असेल तर त्याच्यावर लगेच उपचार सुरू करावेत आणि याची माहिती जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला कळवावे.
-रहेना मुजावर, प्रभारी वैद्यकीय अधिकारी, पनवेल मनपा

 

Check Also

सीकेटी महाविद्यालयात एचआयव्ही एड्सविषयी जनजागृती कार्यक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स …

Leave a Reply