Breaking News

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन

पुणे ः प्रतिनिधी

आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटविणारे दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांचे शनिवारी (दि. 26) निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ते 76 वर्षांचे होते. वयोपरत्वे प्रकृती खालवल्याने गेले पंधरा दिवस ते रुग्णालयात उपचार घेत होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका अशा तीनही माध्यमांतून गोखले यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनही केले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आघात’ हा चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले होते. 2013 साली प्रदर्शित झालेल्या ‘अनुमती’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. कोरोना काळात वयाची पंच्याहत्तरी असतानाही गोखले यांनी ’गोदावरी’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. काही दिवसांपूर्वीच ते स्टार प्रवाहवरील ’तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत दिसले होते. या मालिकेत त्यांनी’मल्हार’च्या गुरूंची भूमिका साकारली होती. सध्या ते नवोदित कलावंतांना अभिनय प्रशिक्षण देण्याचे अध्यापन कार्य करीत होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply