Breaking News

खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयात विविध स्पर्धा

खारघर : रामप्रहर वृत्त

खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय, रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय व रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने उच्च माध्यमिक विद्यालयात (वाणिज्य व शास्त्र) शिकणार्‍या विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रश्नमंजुषा व निबंध स्पर्धा 3 डिसेंबर रोजी (सकाळी 10.00) होणार आहेत तसेच 10 डिसेंबर रोजी (सकाळी 10.00) प्रदर्शन घेतले जाणार आहे. या प्रदर्शनामध्ये स्पर्धकांचे मॉडेल्स व पोस्टर्स प्रदर्शित केले जातील. नवी मुंबई झोनमधील सुमारे 60पेक्षा जास्त उच्च माध्यमिक महाविद्यालयाला या स्पर्धांच्या निमंत्रण पत्रिका पाठवल्या आहेत. या सर्व स्पर्धा घेण्याचा प्रमुख उद्देश उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये असणार्‍या वेगवेगळी व्यावसायिक कौशल्ये, लेखन कौशल्ये, संप्रेषण कौशल्ये, व्यासपीठ धाडस यांचा विकास करणे हे आहे. या प्रत्येक स्पर्धेसाठी सुमारे 30,000 रुपये रोख रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत तसेच या सर्व स्पर्धांच्या नोंदणीसाठी कोणत्याही प्रकारची शुल्क आकारली जाणार नाही. प्रस्तुत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड व रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उषा नायर यांनी वेगवेगळ्या महाविद्यालयातील इच्छुक विद्यार्थी व विद्यार्थिनींना या स्पर्धांसाठी नोंदणी करावी व स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा असे, आवाहन केले आहे. जास्तीत जास्त उच्च माध्यमिक विद्यालये या स्पर्धांमध्ये सहभाग घेतील अशी आशा व्यक्त केली आहे तसेच प्रा. महेश धायगुडे प्रा. डॉ. फारुक शेख, प्रा. सफिना मुकादम, प्रा. तनुजा सुमन प्रा. कावेरी घोगरे, प्रा. विशाल देशमुख हे सर्व स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मेहनत घेत आहेत.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply