Breaking News

सुधागडातील वावळोलीत ग्रामसफाई मोहीम

ग्रामस्थांनी घेतली स्वच्छतेची प्रतिज्ञा

पाली : प्रतिनिधी

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सिद्धेश्वर (ता. सुधागड) ग्रामपंचायत हद्दीतील वावळोली येथे ग्रामसफाई मोहीम राबविण्यात आली. या वेळी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली.

पंचायत समिती सुधागड, ग्रामपंचायत सिद्धेश्वर, प्राइड इंडिया व सुकन्या ग्रामसंघ यांच्या संयुक्तवतीने ही ग्रामसफाई मोहीम राबविण्यात आली. या वेळी तहसीलदार दिलीप रायण्णावार, गटविकास अधिकारी विजय यादव, कृषी अधिकारी अशोक महामुनी, एमआरएलएमच्या अनुराधा गायकवाड,  प्राईड इंडियाचे प्रकल्प व्यवस्थापक वसंत मोरे, ग्रामसेवक ए. टी. गोरड, सुकन्या ग्रामसंघाच्या अध्यक्षा प्राजक्ता यादव, पोलीस पाटील सुधीर महाले, ग्रामपंचायत सदस्या संजना फाळे, रजनी जाधव उपस्थित होते. महिला व ग्रामस्थांबरोबर सर्व अधिकारी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

प्राइड इंडियाच्या रोशना महाले, सचिन मुंढे, गणेश महाले, विजय महाले, स्नेहा यादव, प्राची कदम, मयूरी महाले यांच्यासह वावळोली ग्रामस्थ आणि महिला यांनी ही ग्रामसफाई मोहीम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

Check Also

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …

Leave a Reply