Breaking News

नवीन पनवेल येथे विशेष मतदार नोंदणी शिबिर

पनवेल : वार्ताहर

18 पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता पिल्लाई कॉलेज ऑफ इंजनिअरिंग नवीन पनवेल येथे विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी  तथा जिल्हा निवडणुक अधिकारी रायगड यांचे आदेशाने व उपजल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी  यांचे उपस्थितीत 188 पनवेल विधानसभा मदारसंघातील पिल्लाई कॉलेज ऑफ इंजनिअरिंग, नवीन पनवेल येथे 18 वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नमुना नं. 6 चे – 168 अर्ज व नमुना नं. 8 स्थलांतर / दुरुस्ती करिताचे – 14 अर्ज भरून घेण्यात आले. तसेच मतदार यादीत ऑनलाइन पद्धतीने नाव कसे नोंदवता येईल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply