Breaking News

ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्यास इच्छुक एनेल कंपनीस पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 मुंबई : ऊर्जा क्षेत्रात जागतिक पातळीवर नामांकित कंपन्यांपैकी एक असलेल्या इटली येथील एनेल ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर & नेटवर्क कंपनीने ऊर्जानवीकरणीय ऊर्जासह इतर क्षेत्रात महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखविले आहे. त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा राज्य शासन निश्चितपणे उपलब्ध करुन देईलअसे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

एनेल ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर & नेटवर्क कंपनीचे ग्लोबल बिझनेस डेवलपमेंट विभागाचे प्रमुख मार्सेलो कॅस्टीलो आगुर्तो यांनी आज सागर निवासस्थानी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची सदिच्छा भेट घेऊन चर्चा केली.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी एनेल कंपनीने ऊर्जासह विविध क्षेत्रात केलेली कामेनावीन्यपूर्ण बाबींची माहिती श्री.आगुर्तो यांच्याकडून जाणून घेतली. इटलीतील ही कंपनी जागतिक पातळीवर नाव असलेली मोठी कंपनी आहे. वीजनिर्मितीवीजवितरणवीजगळतीवरील उपाययोजना आदींबाबत काय करता येईलयाबाबतही त्यांनी माहिती घेतली. राज्यात आपण कशाप्रकारे गुंतवणूक करु इच्छिता याबाबत कंपनीच्यावतीने सविस्तर आराखडा आणि सादरीकरण करण्याची सूचना त्यांनी केली.

 कमी खर्चिकवीजगळतीचे प्रमाण कमी करणे आणि सध्याच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे यादृष्टीनेही कंपनीने काम करण्याची राज्य शासनाची अपेक्षा असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

श्री. आगुर्तो यांनीऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूकी सोबतच त्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ येथेच उपलब्ध होईल, यादृष्टीने प्रशिक्षण देण्यासाठीची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply