Breaking News

ईदनिमित्त सलमानचा म्युझिक व्हिडीओ

पनवेल ः वार्ताहर

बॉलीवूडचा भाईजान सलमान खान दरवर्षी ईदला त्याचा चित्रपट प्रदर्शित करतो. दशकभरापासून सलमानने ईदच्या मुहूर्तावर अनेक चित्रपट प्रदर्शित केले आहेत. या वर्षीही सलमानचा ‘राधे’ हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार होता, मात्र सध्या कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. तसेच अनेक चित्रपटांचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले. त्यामुळे सलमानच्या ‘राधे’चे प्रदर्शनही लांबले. परिणामी सलमानचे चाहते नाराज झाले आहेत. या चाहत्यांना खूश करण्यासाठी सलमानने ईदनिमित्त नवा म्युझिक व्हिडीओ ’भाई भाई’ लॉन्च केला आहे. हा व्हिडीओ त्याच्या यू ट्यूब चॅनलवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

कोरोना महामारीच्या या संकटात चाहत्यांना निराश न करण्यासाठी सलमानने पनवेलमधील आपल्या फार्म हाऊसवर कमीत कमी क्रू आणि साधनांसोबत ’भाई भाई’साठी शूटिंग केले. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर या खास गाण्याला प्रदर्शित केले आणि लिहिले की, मी आपल्यासाठी काहीतरी बनवले आहे. बघून सांगा कसे वाटले. तुम्हाला सर्वांना ईद मुबारक. दरम्यान, सलमानच्या या व्हिडीओतून बंधुता आणि एकतेचा संदेश देण्यात आला आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply