Breaking News

ग्रामपंचायत गुळसुंदे व एमआयडीसी यांच्या कराराप्रमाणे अधिकृत नळ जोडणी

२०१८ पासून सुरु असलेल्या पाठपुराव्याला मोठे यश; आमदार महेश बालदी तसेच गुळसुंदे ग्रामपंचायतीचा पाठपुरावा कामी

पनवेल : प्रतिनिधी
 ग्रामपंचायत गुळसुंदे व एमआयडीसी यांच्या बरोबर झालेल्या कराराप्रमाणे अधिकृत नळ जोडणी करण्यात आली असून त्याचे उदघाटन तीन गावातील शेकडो ग्रामस्थांच्या साक्षीने झाले. त्यामुळे आता गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीतील लाडीवली, आकुलवाडी, गुळसुंदे तसेच आदिवासी वाड्यांना शुद्ध व मुबलक पाणी मिळणार असून २०१८ पासून सुरु असलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. याकामी आमदार महेश बालदी तसेच गुळसुंदे ग्रामपंचायतीचा पाठपुरावा कामी आला आहे.
      लाडीवली येथे झालेल्या या कार्यक्रमास सरपंच हरिश्चंद्र बांडे, उपसरपंच शांताराम मालुसरे, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सुनील मिटकरी, एम्आयडीसीचे अधिकारी पाचपुंड, सदस्य मनोज पवार, मारूती माठळ, नूतन पाटील, प्रभावती कार्लेकर, नीता महाडिक, पल्लवी ठाकूर, जयश्री ठोकळ, अनिता वाघमारे, तुराडे ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत भोईर, उपासना गोठळ, चावणे सरपंच सोनावळे, माजी सरपंच आर. डी. पाटील, प्रमोद विद्धांस, गणपत गोठळ, कॉन्ट्रॅक्टर विशाल मांडे, प्रभाकर कार्लेकर, महादेव कावडे, चंद्रकांत ठोकळ, संतोष चौलकर, अंकुश साठे, बाळकृष्ण पाटील, बाळा शेडगे, अनंता म्हामणकर, अशोक मालुसरे, किरण कार्लेकर, भगवान गोडीवले, महादेव शिर्के, भास्कर म्हामणकर, हर्षद कालेकर, नितीन काईनकर, पांडुरंग जाधव, जयवंत म्हामणकर, साहिल म्हामणकर, अलका म्हामणकर, प्रथमेश पाटील, प्रकाश जोशी, दिलीप देव, सुरेश जोशी, निखील पाटील, प्रकाश मोरे, शेखर नवरंगे, विनायक पाटील, प्रशांत पाटील, उमेश गायकवाड, कौस्तुभ चोणकर, भानूदास म्हात्रे, राजा दळवी, संजय पाटकर, अंकीता गोठळ, मेघना जाधव संजय मालुसरे, विलास पाटील, रमेश मालुसरे, नारायण शेडगे, दामोदर चव्हाण, काशिनाथ तांबे, अनिल पंडित, संतोष मोरे, आंबू पवार, रामकृष्ण म्हात्रे, भरत पाटील, महेश मोरे, प्रवीण मोरे, रमेश लेखाकर, सचिन मालुसरे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
     ग्रुप ग्रामपंचायत गुळसुंदेचे सरपंच व सदस्य यांनी २०१८ पासून सर्व प्रथम पाणी टंचाईची कमतरता का होत आहे याची माहिती घेऊन त्या संदर्भात योग्य उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. उरण विधानसभेचे आमदार महेश बालदी यांचे मार्गदर्शन व सहकार्य घेतले.  एम. आय. डी. सी. कडून जोडणी मिळाल्यास भरपूर प्रमाणात पाणी मिळेल अशी खातरजमा करत आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतने एमआयडीसीच्या अंबरनाथ व अंधेरी येथील कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला.  पुर्वीचा चालू असलेला जिल्हा परिषद पाणी पुरवठा कमी दाबाने व अशुद्ध मिळत होता. सदरचा पाणी पुरवठा गावांना कमी प्रमाणात व कमी दाबाने पाणी मिळत असल्याने चार पाच दिवसानून एका पाणी मिळत होते. या कारणासाठी आमदार महेश बालदी यांच्याकडे ही समस्या मांडली असता त्यांनी त्यांच्या आमदार निधीतील पहिले २० लाखाचा निधी पाईप लाईनसाठी लाडीवली व आकुळवाडी गावांना दिला. त्यामुळे सदर पाईप लाईनमधून त्या गावांना एक दिवसआड पाणी सुरू झाला. सदर एम्आयडीसी चे कनेक्शन मिळविण्यासाठी ग्रामपंचायत तुराडे सरपंच व वावेघर ग्रामपंचायत सरपंच त्यांच्याकडे पाणी बील थकबाकी पैकी मार्च २०२२ पासून ५०% भरले व पुढील थकबाकी भरण्याचे लेखी आश्वासन एमआयडीसीला दिले, अशी माहिती गुळसुंदे ग्रामपंचायतीचे सदस्य मनोज पवार यांनी यावेळी दिली.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply