Tuesday , February 7 2023

कामोठ्यातील प्रोफेशनल कॉलेज इमारत उभारणीचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील प्रोफेशनल कॉलेज इमारत  उभारणी कामाचा शुभारंभ ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 2) करण्यात आला. या वेळी त्यांनी हे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम शिक्षण देऊ, असे आश्वासित केले.
कामोठे सेक्टर 11, प्लॉट नं 41 येथे प्रोफेशनल कॉलेजची इमारत उभारली जात आहे. त्याच्या शुभारंभास रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव व पनवेल येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, संस्थेचे जनरल बॉडी सदस्य शैलेश म्हात्रे, बांधकाम समितीच्या चेअरमन व वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शुभदा नायक, फुंडे येथील वीर वाजेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पवार, डॉ. विलास महाले, मंदार पनवेलकर, को-ऑर्डिनेटर सुषमा पाटील, रयत शिक्षण संस्थेचे सहाय्यक विभागीय अधिकारी एस. एस. फडतरे, रायगड विभागीय निरीक्षक आर. पी. ठाकूर, जनसंपर्क अधिकारी बाळासाहेब कारंडे, कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे, लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्य अर्चना खाडे, आर्किटेक नरेंद्र वाळुंज, कन्ल्सटंट उमेश थमके, बिल्डिंग सुपरवायजर विनय म्हात्रे, कॉन्ट्रॅक्टर अजित पवार, श्री. डोंगरे आदी उपस्थित होते.

Check Also

फॉर्म हरवलेला पक्ष

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडण्यापासूनच वादाला तोंड फुटले होते. आता निकाल लागून पाच दिवस …

Leave a Reply