अलिबाग : जिमाका
कोएसोच्या महाड येथील वि. ह. परांजपे विद्यामंदिर येथे बुधवारी (दि. 30) सकाळी नागरी संरक्षण दल व होमगार्ड यांच्यामार्फत राज्य स्कूल सेफ्टी कार्यक्रमांतर्गत मॉकड्रिल करण्यात आले.राज्य स्कूल सेफ्टी कार्यक्रमांतर्गत राज्यातील 34 जिल्ह्यांमधील शाळांमध्ये आपत्तीचे मॉकड्रिल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षण विभाग व युएनडीपी तसेच महाराष्ट्र आपत्ती विभाग यांच्या पुढाकाराने रिका इंडिया या संस्थेच्या सहाय्याने राज्यभरात असे मॉकड्रिल होणार आहेत. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील महाड मधील वि. ह. परांजपे विद्यामंदिरमध्ये बुधवारी नागरी संरक्षण दल व होमगार्ड यांच्यामार्फत मॉकड्रिल करण्यात आले. या वेळी नागरी संरक्षण दलाचे अधिकारी व त्यांच्या सहकार्यांनी नववीच्या 87 विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक सरावाचे प्रशिक्षण दिले. ज्येष्ठ सहाय्यक शिक्षक ज्ञानदेव साळवे यांनी सूत्रसंचालन केले. शाळा व्यवस्थापन समितीचे सभापती मिलिंद टिपणीस, नायब तहसीलदार प्रदीप कुडळ, सुरेश खोपकर, नागरी संरक्षण दलाचे सहाय्यक उपनियंत्रक का. र. कुरकुटे, श. भा. शिरसाट, वरिष्ठ प्रशासकीय लिपिक वि. ग. पाटील, रिका इंडिया या संस्थेच्या पोग्रॅम मॅनेजर अंबिका डबराल, होमगार्डचे जिल्हा प्रभारी गणेश कदम, तालुका समादेशक अधिकारी एस. एस. अंतुले, प्रफुल्ल जाधव, राजू पाटील, अग्निशामक दलाचे अधिकारी गणेश पाटील आणि त्यांची टीम, शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका स्वराली रोठ यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. सहाय्यक शिक्षक नरेश पाटील यांनी आभार मानले.