Breaking News

सर्वांच्या सहकार्याने शाळेची प्रगती शक्य -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त
गावकरी, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि संस्था या सर्वांचा सहयोग असला, तर शाळेची प्रगती अधिक होण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन रयतचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्नेहसंमेलनाच्या वेळी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या रिटघरमधील श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन तसेच माता पालक मेळावा आणि हळदी कुंकू समारंभ एकत्रितपणे शनिवारी (दि. 4) साजरा करण्यात झाला. त्यावेळी ते बालत होते. विद्यालयाचा स्नेहसंमेलन सोहळा हा जल्लोष 2023 या शिर्षकाखाली साजरा झाला असून विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केली, तसेच या सोहळ्यानिमित्त आयोजित केलेया हळदी कुंकू समारंभाला महिला उत्स्फूर्द प्रतिसाद लाभला.
या सोहळ्याला रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय. टी. देशमुख, दुंदेरे ग्रामपंचायतीच्या सरपंच अनुराधा वाघमारे, स्कूल कमिटी सदस्य सुभाष भोपी, वंदना भोपी, बळीराम भोपी, राजेश भोपी, भारत भोपी, बबन साळूंखे, पोलीस पाटील दिपक पाटील, राजेश भोपी यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शाळेत येणार्‍या काळात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून हे शिक्षण घेउन विद्यार्थी गावाला नावलौकिक मिळवून देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply