म्हसळा : प्रतिनिधी
येथील सार्वजनिक वाचनालय व पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त वतीने केंद्र प्रमुख, प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांच्यासाठी म्हसळ्यातील न्यू इंग्लीश स्कुलमध्ये ध्वजारोहणाचे प्रात्यक्षिक व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रशिक्षक राजेंद्र मालुसरे यांनी उपस्थिताना ध्वजाचे प्रमाणित आकार, लावण्याची पध्दत, शाळांमधून ध्वजारोहण, ध्वजवंदन, ध्वजासमोरील ध्वज निष्ठेची प्रतिज्ञा, ध्वजाची घडी घालण्याची सोपी पध्दत व गाठ मारण्याचे कौशल्य या बाबत सविस्तर माहिती दिली व उपस्थितांनी विचारलेल्या शंकाना उत्तरे दिली.
या वेळी गट शिक्षण अधिकारी संतोष शेडगे, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, न्यू इंग्लीश स्कूलचे प्राचार्य के. एल. जाधव, गजानन साळुंखे, अनिल ठाकूर, कुमार खामकर, धोंडीराम सुर्यवंशी, बी. आर. आडे, किशोर मोहिते, सुनिल पवार, सलाम कौचाली, उमेश गोदाडे, दिपक पाटील, प्रकाश कोठावळे, ग्रंथपाल उदय करडे, सायली चोगले, धनश्री नाक्ती, दिपक चव्हाण आदी उपस्थित होते.