पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका क्षेत्रात स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2022-23ची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. त्या अंतर्गत पुतळे व उद्याने यांची स्वच्छता मोहिम महापालिकेच्या वतीने नुकतीच घेण्यात आली. स्वच्छता श्रमदान मोहिमेच्या माध्यमातून ‘रिस्पेक्ट टू फ्रिडम फाईटर’ अर्थात स्वातंत्र्यसैनिकांना मानवंदना देण्यात आली.
पनवेल महापालिका क्षेत्रात स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022-23’ची प्रभावी अमंलबजावणी सुरू आहे. पनवेल शहराच्या स्वच्छतेवरती महापालिकेने विशेष लक्ष दिले आहे. विशेषतः स्वच्छता हा नागरिकांच्या सवयीचा भाग व्हावा, लोकांमध्ये जनजागृती वाढावी, यासाठी पालिका विविध उपक्रम राबवित आहे पनवेल शहर स्वच्छ व सुंदर व्हावे राज्यातच नव्हे तर देशातील सुंदर शहरांमध्ये पनवेलचा समावेश व्हावा, यासाठी महापालिकेच्या वतीने विविध पातळ्यांवर प्रयत्न केले करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिका हद्दीतील पुतळे व उद्याने यांची स्वच्छता मोहिम महापालिकेच्या वतीने नुकतीच घेण्यात आली. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर चौक अशा विविध ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. या अभियानामध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन पनवेल महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत स्वच्छता श्रमदान मोहिमेच्या माध्यमातून ‘रिस्पेक्ट टू फ्रिडम फाईटर’ अर्थात स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली. पनवेल महापालिका प्रशासनाच्या मार्गदशनाखाली स्वच्छता श्रमदान मोहिमेच्या माध्यमातून स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या स्वातंत्र्यसंग्रामातील योगदानाची जाणीव, त्याचे महत्व लक्षात घेऊन त्यांच्या कार्याला सलाम करण्यात आला.
या वेळी महापालिकेचे आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, अभिजित भवर, इन्फिनीटी फाऊंडेशन सामाजिक संस्थाचे कार्यकर्ता, नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, पनवेल महापालिका हद्दीत स्वच्छतेविषयक विविध उपक्रम राबविण्यात येत असतात.