Breaking News

पनवेल ग्रामीण भागात लागणार पाण्याचे मीटर

खारघर : प्रतिनिधी, पनवेल : वार्ताहर
पनवेल महापालिका क्षेत्रातील पनवेल शहर व 29 गावांमध्ये लवकरच पाण्याचे मीटर लागणार आहेत. यासंदर्भात लवकरच पालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत निविदा काढण्यात येणार असून याकरिता सुमारे 18 कोटींचा खर्च येणार आहे. अमृत योजनेअंतर्गत या कामाला मंजुरीदेखील मिळाली आहे.
पनवेल शहर व ग्रामीण भागात हे मीटर लागणार आहेत.सध्याच्या घडीला पाणीपुरवठा करताना नागरिकांकडून सरासरीनुसार पाण्याचे वार्षिक बिल आकारले जाते. विशेष म्हणजे पाणीपुरवठा करीत असताना चोख मोजमाप यामुळे होत नाही. यामध्ये अधिक सुसूत्रता येणार असून प्रत्येक कनेक्शन मागे पाणी मीटर लागणार असल्याने पाण्याचा वापरदेखील काटकसरिने होणार आहे. पनवेल महापालिकेच्या वतीने काही ठिकाणी नव्याने पाणी जोडणी देण्यात आली आहे. यामुळे अशाठिकाणी हे मीटर लागणार आहेत.पनवेल महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार जवळपास 11569 मीटर नव्याने बसविले जाणार आहेत. यामुळे जेवढे पाणी वापरण्यात येईल तेवढेच पाण्याचे बिल या रहिवाशांना भरावे लागणार आहे. पनवेल शहर आणि ग्रामीण भागात मीटर लावण्यासाठी निविदा मागविण्यात येत आहेत. यासंदर्भात टेंडर प्रक्रिया देखील अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पाणीपुरवठा अधिकारी विलास चव्हाण यांनी दिली.काही ठिकाणी नव्याने जलवाहिनी टाकून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. सध्याच्या घडीला पाणी वापरावर कोणतेही निर्बंध अथवा मोजमाप यंत्रणा अस्तित्वात नसल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय सुरु आहे. हजारो लिटर पाणी वाया जात असून मीटर लागल्यावर पाण्याचा अपव्यह आपोआप थांबणार आहे.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply