Breaking News

पनवेलच्या डेरवलीत रस्ता काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
उरण मतदारसंघात आणि पनवेल तालुक्यात असणार्‍या डेरवली गावातील दर्गा ते निर्मल नगरी सोसायटीपर्यंतच्या रस्ता काँक्रीटीकरणाचे काम आमदार महेश बालदी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रयत्नातून मंजूर झाले आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 1) झाले. या वेळी तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांनी आमदार महेश बालदी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून दोन्ही मतदारसंघामध्ये विकासाची गंगा वाहत असून आगामी काळातही अशाच प्रकारची अनेक विकासकामे या परिसरात होणार असल्याचे सांगितले.
पनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण मतदारसंघात आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून विकासकामांचा झंझावात सुरू आहे. त्यानुसार आमदार महेश बालदी यांच्या सात लाख रुपयांच्या ग्रामविकास निधीमधून डेरवली गावातील दर्गा ते निर्मल नगरी सोसायटीपर्यंत या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, रवींद्र शेळके, डेरवलीचे युवा मोर्चा अध्यक्ष शैलेश शेंडे, महेश कनसे, सुनील पवार, विकास सावंत, मनीषा भोर, अतुल भोईर, विनोद शेळके, अर्जुन शेळके, विनेश पाटिल, मितेश दरे, अविनाश भोईर, आकाश भोईर, सुरेश पाटील, राम म्हात्रे, अनंता पाटील, तुळशीराम दरे, दीपक दरे, बाळाराम शेंडे, प्रभाकर नाईक, भारत गायकवाड, रोहन पाटील, संदीप बसवेश्वर, विजय घुगे, हरिश्चंद्र पाटील, ज्ञानेश्वर दरे, भरत पाटील, अपेक्षा कांबळे, स्वर्धा शेटे, निकिता जाधव, शुक्रिया शेख, रेणुका पाटील, गुडिया त्रिपाठी, शर्यू वराडकर, रूपेश शेंडे, महेश शेंडे यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ आणि रहिवासी उपस्थित होते. या वेळी अतुल भोईर यांना वाढदिवसानिमित्त पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शुभेच्छा दिल्या.

Check Also

आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे

तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास …

Leave a Reply