Breaking News

अवैध रेती उत्खननाविरोधात पेण तहसील कार्यालयाची कारवाई

पेण : प्रतिनिधी

धरमतर खाडीलगत होत असलेल्या अवैध रेती उत्खननाविरोधात पेण तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे व कर्मचार्‍यांनी कारवाई करीत 41 ब्रास अनाधिकृत वाळूसाठा जप्त केला आहे. पेण तालुक्यात अनेक ठिकाणी अनधिकृत गौणखनिज उत्खननाचे काम होत असून या विरोधात उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या मार्गदर्शनखाली पेण तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे व कर्मचारी यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पेण तहसील कार्यालयातील अनधिकृत गौणखनिज उत्खनन भरारी पथकाला धरमतर खाडीलगत काराव, वडखळ परिसरात पाहणी करीत असताना 41 ब्रास अनधिकृत वाळूसाठा आढळून आला. तो जप्त करून उपविभागीय कार्यालच्या आवारात जमा करण्यात आला. तसेच धरमतर खाडी शेजारी रेल्वे पुलाखाली डम्पर (एमएच 46,एएफ 9384) मध्ये अर्धा ब्रास वाळू भरताना आढळून आले. या प्रकरणी संबंधित वाहन मालकाला दोन लाख 11 हजार 444 रुपये दंड आकारण्यात आला. पेण तहसील कार्यालयातील कर्मचारी शिवाजी वाबळे, पार्वती वाघ, मंडळ अधिकारी डी. एच. साळुंके, मंडळ अधिकारी प्रकाश मोकल, सारिका तांडेल यांनी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

रोहा किल्ला येथे माती चोरी; जेसीपीसह तीन डम्पर जप्त

धाटाव  : रोहा तालुक्यातील किल्ला येथे वन जमिनीचा जागेतून बेकायदेशीर उत्खनन करत असलेल्या माती चोरांवर वन खात्याने कारवाई करत वाहने ताब्यात घेतली. या कारवाईने किल्ला धाटाव परिसरातील माती चोरांची धाबे दणाणले आहेत. किल्ला येथील वन जमिनीमध्ये (गट नंबर 111) बेकायदेशीर माती उत्खनन सुरू होते. रविवारी (दि. 11) वन खात्याने या माती चोरांवर कारवाई करीत जेसीपी (एमएच-06,एएल-7165), डम्पर (एमएच-05,एएम-0749), (एमएच06,एसी-6606), (एमएच06, एजी-6608) ही वाहने जप्त केली. या प्रकरण भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 35 (1) (7 ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज वाघमारे करीत आहेत.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply