Breaking News

सीकेटी महाविद्यालयात नृत्याविष्कार

वार्षिक स्नेहसंमेलनास मान्यवरांची लाभली उपस्थिती

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त

खांदा कॉलनी येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक मंडळाच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा दर्पण आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास शनिवारी (दि. 22) संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. खांदा कॉलनी पनवेल महापालिकेच्या येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक मंडळाच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा दर्पणमध्ये विद्यार्थ्यांनी विविध नृत्याविष्कार सादर केले. या वेळी पनवेल महापालिकेच्या नगरसेविका चारुशिला घरत, हेमलता म्हात्रे, कुसुम पाटील, राजश्री वावेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य वसंत बर्‍हाटे यांच्यासह मान्यवर आणि पालक उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply