विभाग नियंत्रक दिपक घोडे यांना निवेदन
पेण : प्रतिनिधी
पेण-पाली-नागोठणे आणि रोहा-पनवेल या मार्गांवर गाड्यांच्या संख्येत वाढ करुन फेर्या वाढवाव्यात, अशी मागणी गडब, कासू प्रवाशी संघटन व विद्यार्थ्यांनी एसटीचे विभाग नियंत्रक दीपक घोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पालखार-पेण, पेण-नागोठणे, पेण-पाली, पेण -रोहा, पालखार-पनवेल या बस फेर्या वाढविण्यात याव्यात. पेण, रामवाडी व वडखळ स्थानकांची दुरुस्ती व नूतनीकरण करण्यात यावे, सर्व गावातील बस थांब्यांवर फलक लावण्यात यावेत, पेण आगारातून बस निर्धारीत वेळेत सोडाव्यात, एसटी गाड्यांतील मोडक्या सीट व नादुरुस्त गाड्यांची दुरुस्ती करण्यात यावी, साफ केलेली गाडी प्रवाशांसाठी पाठवावी आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे. हे लेखी निवेदन एसटीचे विभाग नियंत्रक दीपक घोडे यांना देण्यात आले. या वेळी रुचिता तांडेल (कासू), अभय पाटील (डोलवी), निलीमा पाटील (सालिंदे), योगेश ठाकूर (डोलवी), लक्ष्मण पाटील (पाटणी कासू) यांच्यासह कासू,गडब विभागातील एसटी बस प्रवासी संघटनेचे सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रती पेणचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार व पेण आगारप्रमुख यांनाही दिल्या.