माणगाव : प्रतिनिधी
माणगाव नगरपंचायत हद्दीत गेल्या आठ दिवसांमध्ये शासकीय कार्यालयांबरोबरच घरांतून 19 कोरोना रुग्ण आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून माणगावकरांनी एकत्र येऊन घेतलेल्या बैठकीत पाच दिवस स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी (दि. 29) पहिल्याच दिवशी जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले.
लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यापासून माणगाव नगरपंचायत हद्दीत कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. सद्यस्थितीत सातत्याने रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा असलेली रुग्णालये व औषधांची दुकाने सोडून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत, तर दूधविक्रेत्यांना केवळ सकाळी 6 ते 9 या वेळेत परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, माणगावच्या शेजारील इंदापूरमध्ये नागरिकांची गर्दी होत असून, त्यावर निर्बंध आणण्याची मागणी होत आहे.
Check Also
पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …