पनवेल : रामप्रहर वृत्त
स्वर्गीय चांगु काना ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन लोकनेते रामशेठ ठाकूर आणि ग्रामस्थ मंडळ शिवाजीनगर यांच्या वतीने येथे करण्यात आले होते. पनवेल तालुक्यातील शिवाजीनगर येथे श्री समर्थ दासबोध ग्रंथ वाचन, चरित्रामृत ग्रंथाचे पारायण, भजन, प्रवचन, किर्तन आणि शनिवारी माऊलींवर पुष्पवृष्टी अश्या विविध अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
स्वर्गीय चांगू काना ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या अध्यात्मिक कार्यक्रमाला रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शकुंतला ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, नितीन पाटील, चारुशीला घरत, पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा घरत, भरतशेठ ठाकूर, भाजपचे नेते संजय पाटील, माजी नगरसेवक गणेश कडू, माजी नगरसेविका दर्शना भोईर राजेश्री वावेकर, वसंत शेठ पाटील, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, अरुण शेठ ठाकूर, केदार भगत, प्रितम म्हात्रे, अमोल ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Check Also
भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …
RamPrahar – The Panvel Daily Paper