Breaking News

‘रयत’च्या विभागीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या गव्हाण विद्यार्थिनींचा सन्मान

पनवेल : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या रायगड विभागाच्या वतीने कृतज्ञता सप्ताह अंतर्गत घेण्यात आलेल्या विभागीय वक्तृत्व स्पर्धेमधील गव्हाण विद्यालयाच्या चार विद्यार्थिनींनी विविध गट आणि विविध भाषांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. या चौघींचा प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात झालेल्या एका शानदार पारितोषिक वितरण समारंभात या चौघींना समान पत्र आणि रोख रकमेची पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध वैज्ञानिक आणि भारताच्या अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या समारंभात ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील आदींच्या हस्ते या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. गव्हाण विद्यालयाच्या आरोही प्रमोद कोळी (हिंदी/मध्यम गट), गौरी दुर्गाराम चौधरी (हिंदी/लहानगट), किरण संजय जैस्वार (इंग्रजी/मध्यम गट) आणि रुपाली मंजुळकर  इंग्रजी/ मोठा गट) या विद्यार्थ्यीनींना विभागीय वक्तृत्व स्पर्धेती प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल रोख पारितोषिके आणि सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.गव्हाण विद्यालयाचा विद्यार्थी स्मीत मोकल यास कर्मवीर जयंतीनिमित्त झालेल्या भाषणाबद्दल लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वतीने दरवर्षी बारा हजार रुपयांची पारितोषिक देण्यात येणार आहे. या वर्षीचे रूपये बारा हजार रुपयांचे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते या वेळी त्यास देण्यात आले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply