उरण ः वार्ताहर, प्रतिनिधी
उरण तालुक्यातील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 35 ग्रामपंचायतींपैकी 18 ग्रामपंचायतींसाठी मतदान रविवारी (दि. 18) सकाळी मतदारांची गर्दी केली होती. सरासरी 88 टक्के मतदान झाले आहे. निवडणुकीच्या अनुशंगाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था राहावी, शांततेत मतदान व्हावे याकरिता सहाय्यक पोलीस आयुक्त पोर्टविभाग धनाजी क्षिरसागर व उरण वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान झाले. पाणजे, डोंगरी, रानसई, पुनाडे, सारडे, नवीन शेवा, धुतूम, करळ, कळंबूसरे, बोकडवीरा, वशेणी, पागोटे, पिरकोन, जसखार, चिर्ले, भेंडखळ, नवघर व घारापुरी ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली.