भाजप आक्रमक; मुख्याधिकार्यांना निवेदन
खोपोली ः प्रतिनिधी
खोपोली शहरातील विविध नागरी समस्यांबाबत भारतीय जनता पक्ष शहर आक्रमक झाली असून, शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकार्यांनी मुख्याधिकारी अनुप दुरे यांना निवेदन देण्यात आले. या समस्या तातडीने सोडविण्याची मागणीही या वेळी करण्यात आली.
शहरातील पाणी समस्या, स्वच्छता, बंद नाट्यगृह, उद्यानांची दुर्दशा, मुख्य रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी, रस्त्यांवर अनेक भागात होणार्या टपर्यांचे अतिक्रमण, त्याचप्रमाणे विविध प्रभागातील पार्किंग समस्या, या विविध समस्यांवर चर्चा होऊन त्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी दिले.
या वेळी खोपोली भाजप अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, सरचिटणीस हेमंत नांदे, प्रमोद पिंगळे, उपाध्यक्ष रमेश रेटरेकर, उत्तर रायगड जिल्हा वैद्यकिय सेल अध्यक्ष डॉ. नागरगोजे, चिटणीस सुमिता महर्षि, महिला आघाडी सरचिटणीस अश्विनी अत्रे, मीडिया सेल राहुल जाधव, सचिन मोरे, शक्ति प्रमुख संजय म्हात्रे, देवेंद्र पाटिल, जिल्हा सदस्य स्नेहल सावंत, अपर्णा साठे,वैद्यकीय सेलसह संयोजक विकास नाईक, माथाडी कामगार अध्यक्ष राम पवार, कीर्ति ओसवाल, सुरेन जाधव, बूथ अध्यक्ष नीलेश ओसवाल, गिरीष अभाणी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.