पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यी, पालक, शिक्षक व स्थानिक शाळा समितीच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या पालकांची पालक सभा विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन आणि रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
विद्यालयातील इयत्ता दहावी अ ब आणि क अशा वर्गनिहाय संपन्न झालेल्या पालक सभेला माननीय अरुणशेठ भगत यांच्यासह विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंताशेठ ठाकूर व विश्वनाथ कोळी, ज्येष्ठ नेते जयवंतराव देशमुख, विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य प्रमोद कोळी व रवींद्र भोईर, लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर यांच्यासह वर्गशिक्षक सागर रंधवे, संदीप भोईर व चित्रलेखा पाटील आणि विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एस.एस.सी परीक्षा मार्च 2023 ला विद्यालयातून प्रविष्ट होणार्या विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्र परीक्षा निकाला संदर्भात चर्चा करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित केलेल्या या पालक सभेला अध्यक्षपदावरून संबोधताना विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन अरुणशेठ भगत यांनी हत्या शैक्षणिक वर्षाच्या उर्वरित कालखंडामध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे पालकांनी लक्ष द्यावे आणि विद्यार्थ्यांनी आपल्या शंका निरसन संबंधित शिक्षकांकडून करून घ्यावे तसेच सातत्यपूर्ण अभ्यास करून यश संपादन करावे, असे आवाहन केले.स्थानिक शाळा समितीचे सदस्य विश्वनाथ कोळी यांनीही महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना केल्या.या वेळी काही पालकांनीदेखील विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण सूचना करून मार्गदर्शन केले.
Check Also
पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …