कराची ः वृत्तसंस्था
पाकिस्तान सुपर लीग टी-20 मालिकेदरम्यान एका सामन्यात आपल्याच संघातील खेळाडूशी क्षेत्ररक्षण करताना धडक होऊन जखमी झालेल्या फाफ ड्यू प्लेसिसच्या स्मृतीवर काही प्रमाणात परिणाम (मेमरी लॉस) झाला आहे, परंतु त्याची प्रकृती उत्तम आहे.
पेशावरच्या डावाच्या 19व्या षटकात सीमारेषेपाशी चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात ग्लॅडिएटर्सच्या ड्यू प्लेसिसचे डोके क्वेट्टा ग्लॅडिएटर्सच्या मोहम्मद हसनैनशी अनवधानाने धडकले. या घटनेनंतर प्लेसिस मैदानावर कोसळला आणि काही मिनिटे तसाच पडून होता. हा प्रकार घडल्यानंतर प्राथमिक उपचारानंतर प्लेसिस डगआऊटकडे परतला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
‘धडकेमुळे काही प्रमाणात माझ्या स्मृतीवर परिणाम झालाय, परंतु माझी प्रकृती उत्तम आहे. मी लवकरच मैदानात परतेन अशी आशा आहे. खूप सारे प्रेम,’ असे ट्विट प्लेसिसने केले आहे.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …