Breaking News

‘थर्टीफर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागही सज्ज

विशेष भरारी आणि गस्ती पथकांची नेमणूक

अलिबाग : प्रतिनिधी
31 डिसेंबरला होणार्‍या दारू पार्ट्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची नजर राहणार आहे. रायगड जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक, विक्री तसेच हातभट्टी ठिकाणांवर कारवाई करण्याकरिता या विभागाच्या भरारी पथकांबरोबरच विशेष गस्ती पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. परराज्यातून येणार्‍या संशयित वाहनांची तसेच संशयित ढाबे, हॉटेल यांची तपासणी करण्याबाबत सूचना राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिल्या आहेत.
नववर्षानिमित्त जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यातील हॉटेल, कॉटेज तसेच इतर ठिकाणी दारू विक्री केली जाते, पण यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा तात्पुरता परवाना घेणे बंधनकारक आहे. असे परवाने घेऊनच दारूविक्री किंवा वितरण करावे अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. त्या दृष्टीने नेमण्यात आलेल्या विविध पथकांद्वारे अशा ठिकाणांची नियमित पाहणी करण्यात येणार असून नियमबाह्य कृती आढळल्यास त्यांच्यावर मुंबई दारूबंदी अधिनियम 1949नुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. परवान्याशिवाय अशा प्रकारच्या पार्टीचे नियोजन केल्याचे आढळून आल्यास आयोजकाबरोबर उपस्थित सर्वांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
अवैध मद्य विक्रीबाबत कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा टोल फ्री क्रमांक 18002339999 तसेच अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, रायगड येथील दूरध्वनी क्रमांक 02141-228001 येथे संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी केले आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply