Breaking News

सीकेटी विद्यालयात पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) मराठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयामध्ये गुरुवारी (दि.29) पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमास डॉ. अस्मिता जगदिश घरत आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सह-सचिव भाऊसाहेब थोरात, उच्च माध्यमिक विभागाचे प्राचार्य प्रशांत मोरे, मराठी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक कैलास सत्रे, इंग्रजी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निलिमा शिंदे, उच्च माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका स्वाती पाटील, मराठी माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक कैलास म्हात्रे, इंग्रजी माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका निरजा मॅडम इंग्रजी पूर्व प्राथमिक विभागच्या पर्यवेक्षिका अय्यर मॅडम तसेच शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षा उज्ज्वला भिसे मॅडम, सह-सचिव रेखा माने व मराठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभगाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या प्रमुख पाहुण्या डॉ. अस्मिता जगदिश घरत तसेच सर्व मान्यवरांचे स्वागत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापक सुभाष मानकर यांनी केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयात घेण्यात आलेल्या शालांतर्गत स्पर्धा, बाह्य स्पर्धा व वार्षिक क्रीडा स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडला. या वेळी स्वरा सचिन भिसे व अर्णव अमोल शिंदे यांनी नृत्य सादर करून मान्यवरांकडून शाबासकी मिलवली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राथमिक विभागाचे सहाय्यक शिक्षक पंढरीनाथ जाधव यांनी केले.

Check Also

नवी मुंबई विमानतळावर ‘दिबां’चे विशेष फलक लावू -ना. गणेश नाईक

शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन उरण : प्रतिनिधीनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लोकनेते दि. बा. पाटील यांचे …

Leave a Reply