Breaking News

सुधागडात शेकापला मोठा धक्का; अडूळसेतील ग्रामस्थांचा भाजपमध्ये प्रवेश

सुधागड ः प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची समजल्या जाणार्‍या अडूळसे ग्रामपंचायत हद्दीतील अडूळसे गावच्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. पाली येथील झाप येथे रायगड भाजपच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभ नुकताच झाला. या वेळी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी गळ्यात पक्षाची शाल घालून स्वागत केले. शेकापचे ज्येष्ठ नेते महादू भीवा दळवी, शेकापचे नाडसूड विभाग चिटणीस ज्ञानेश्वर फोंडे, दुर्गेश हंबीरे, अडुळसे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य भगवान दळवी, रघुनाथ बावदाने, गणेश बावदाने, माजी उपसरपंच लुमा हंबीर अढुळसे, मारुती जाधव, रमेश ठोंबरे, सटूराम पोंगडे, नामदेव कदम, एकनाथ जाधव, काळूराम जाधव, पांडुरंग हंबीर, मंगेश हंबीर, माळू बावदाने, राम केंडे, गणेश बावदाने यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, गिता पालरेचा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अडूळसेचे माजी सरपंच भाऊराव कोकरे यांच्या पुढाकाराने भाजपचे कमळ हाती घेतले. कार्यक्रमासाठी सतीश धारप, युवा नेते वैकुंठ पाटील, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, बिपीन म्हामुणकर, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस रवी मुंढे, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष अमित घाग, जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष वैशाली मपारा, जिल्हा उपाध्यक्ष श्रेया गुंठे, सुधागड तालुकाध्यक्ष चंद्रकांत घोसाळकर, रोहा तालुकाध्यक्ष सोपान जांबेकर, तळा तालुकाध्यक्ष निलेश रातवडकर, महाड तालुकाध्यक्ष जयवंत दळवी, गीता पालरेचा, आरती भातखंडे, सचिन मोदी, माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र गांधी, रमेश साळुंके, विकास माने, आलाप मेहता, सागर मोरे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply