Breaking News

दिविल ग्रामपंचायतीचा निवडणूक निकाल बदलला

भाजप उमेदवारांकडून आमरण उपोषणाचा इशारा

पोलादपूर : प्रतिनिधी
पोलादपूर तालुक्यातील दिविल ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालातील गोंधळ आता अधिकच वाढला असून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने निकाल बदलून नवीन सदस्यांची नावे प्रसिद्ध केल्याचे पत्र जारी केले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षात अन्यायाची भावना निर्माण झाली असून या उमेदवारांकडून 12 जानेवारी 2023पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पोलादपूर तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाच्या निकालानुसार दिविल ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2च्या भाजप उमेेदवार सुवर्णा भाऊ भिलारे यांना एकूण 344 पैकी 171 मते प्राप्त झाल्याने त्या विजयी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे, तर प्रतिस्पर्धी उमेदवार रूपाली तुषार पवार यांना 25 मते, मनिषा निलेश शिंदे 146 आणि नोटा 2 मते अशी आकडेवारी आहे. याच प्रभागातील भाजपचे अन्य उमेदवार मंगेश देवलिंग जंगम यांना एकूण 344 पैकी 189 मते मिळाल्याचे जाहीर करून विजयी घोषित करण्यात आले आहे, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार प्रमोद चंद्रकांत मोरे यांना 9, सविता सदाशिव सोनावणे यांना 145 आणि नोटा 1 अशी मते आहेत. या निकालाखाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलेले पोलादपूर पंचायत समितीचे कृषी अधिकारी वसावे यांची स्वाक्षरी आहे.
निवडून आलेल्या उमेदवारांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात आली होती. यानंतर जिल्हाधिकार्‍यांच्या पत्रान्वये नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे, मात्र यात सदस्यपदी सुवर्णा भिलारे यांच्याऐवजी रूपाली पवार आणि मंगेश जंगम यांच्याऐवजी प्रमोद मोरे यांचे नाव आहे. निकालातील बदलामुळे भाजप उमेदवारांमध्ये अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली असून त्यांच्या वतीने निवडणूक प्रतिनिधी विश्वास हरिश्चंद्र नलावडे यांनी पोलादपूर तहसील कार्यालयासमोर 12 जानेवारी 2023पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply