Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास उपस्थिती

विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने 51वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन कळंबोली येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचा समारोप आणि आणि पारितोषिक वितरण भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि.31) झाले.
सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोलीतील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात 29 ते 31 जानेवारीदरम्यान जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनादरम्यान निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, व्याख्यान, प्रश्नमंजुषा यांसारख्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांचे बक्षीस वितरण आणि विज्ञान प्रदर्शनाचा समारोप कार्यक्रम बुधवारी झाला.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर तयार केलेल्या प्रकल्पांची आमदार प्रशांत ठाकूर यांनी माहिती घेतली व त्यांच्याशी संवाद साधला. प्रदर्शनादरम्यान घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विद्यार्थ्यांना या वेळी आमदार प्रशांत ठाकूर व इतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे-पवार, माजी नगरसेवक अमर पाटील, बबन मुकादम, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये, यासीन पोशीलकर, प्राचार्य राजेंद्र पालवे, सीताराम मोहिते, उपमुख्याध्यापक मोरे यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply