Breaking News

आजपासून रायगडात पोलीस भरती

संपूर्ण मैदानात सीसीटीव्ही कॅमेरे

अलिबाग ः प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील पोलीस भरतीला मंगळवारपासून (दि. 3) अलिबागेत पोलीस मुख्यालयात सुरुवात होणार आहे. ही भरती प्रक्रिया 22 जानेवारीपर्यंत सुरू राहील. पोलीस शिपाई पदाकरीता 19176 तर चालक पोलीस शिपाई पदांकरीता 647 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. भारती प्रक्रिया पारदर्शक व्हावी व कोणताही अनुचित पराक्र घडू नये यासठी संपूर्ण मैदानात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत, अशी माहिती रायगड पोलीस अधीक्षक सुधाकर घार्गे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत  दिली. अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे तसेच इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पोलीस शिपाईची 272 पदे व चालक पोलीस शिपाई सहा पदांकरीता ही भरती प्रक्रिया होणार आहे. 81 पदे ही महिलांसाठी आरक्षित आहेत, तर पाच टक्के पदे खेळाडूंसाठी आरक्षित आहेत. पोलीस शिपाई पदाकरीता पुरूष उमेदवारांचे 15,949 व महिला उमेदवारांचे 3,227 असे एकूण 19,176 आवेदन अर्ज प्राप्त झालेले आहेत, तर चालक पोलीस शिपाई या पदाकरीता पुरूष उमेदवारांचे 624 व महिला उमेदवाराचे 23 असे एकूण 647 आवेदन अर्ज प्राप्त झालेले आहेत. पोलीस शिपाईच्या 272 पदांमध्ये पोलीस भरती बंदोबस्ताकरीता 53 पोलीस अधिकारी 367 पोलीस अंमलदार व 27 मंत्रालयीन कर्मचारी असे मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे.

2 जानेवारी रोजी पोलीस मुख्यालय, रायगड-अलिबाग येथे पोलीस भरती बंदोबस्ताची रंगीत तालीम करण्यात आली. या पोलीस भरतीच्या वेळी उमेदवारांची बायोमॅट्रिक पडताळणी करण्यात येणार असून भरती प्रक्रियेदरम्यान संपूर्ण मैदान सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीखाली राहणार आहे. प्रत्येक इव्हेंटचे व्हिडीओ रेकोर्डिंग करण्यात येणार आहे. प्रत्येक इव्हेंटसाठी विशिष्ट अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. उमेदवारांची राहण्याची व्यवस्थाही पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आली आहे. एकाच दिवशी उमेदवारांच्या शारीरिक चाचणी व प्रमाणपत्र पडताळणी पूर्ण केली जाणार आहे.

पोलीस भरती प्रक्रिया ही निपक्षपातीपणे पार पडणार असून कोणत्याही गैरप्रकाराला यामध्ये थारा देण्यात येणार नाही. संपूर्ण मैदानात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत . सध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात आले आहेत. कोणताही व्यक्ती भरती करून देण्याचे अमिष दाखवून पैशांची मागणी करीत असल्यास किंवा आर्थिक गैरव्यवहाराचा संशय आल्यास तत्काळ पोलीस अधिक्षक कार्यालय (02141) 228473, 222028 येथे संपर्क साधावा. -सुधाकर घार्गे, पोलीस अधीक्षक रायगड

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply