Breaking News

पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन

पुणे ः प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने मंगळवारी (दि. 3) निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वाचे नेते म्हणून लक्ष्मण जगताप यांची ओळख होती. तेथील महापालिकेचे प्रतिनिधित्व करण्यापासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. मनपाचे महापौरपदही त्यांनी भूषविले. 2014 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचवर्षी आणि त्यांनतर 2019 असे दोन वेळा ते भाजपचे आमदार म्हणून निवडून आले. 2017 साली महापालिकेत भाजपची सत्ता स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. गेल्या वर्षी मुंबईत राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी पुण्याहून रुग्णवाहिकेने आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार मुक्ता टिळक आल्या होत्या. त्या वेळी भाजपने या दोघांच्याही त्याग आणि समर्पण वृत्तीचे कौतुक केले होते. काही दिवसांपूर्वीच आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले. त्यानंतर हा दुसरा धक्का आहे. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त होत आहे.

Check Also

पनवेल कोळीवाड्यात आई एकविरा मातेचे तैलचित्र, सभामंडप, सेल्फी पॉईंटचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान …

Leave a Reply