Breaking News

भाजप महिला मोर्चाची सामाजिक बांधिलकी; अंगणवाडी घेतली दत्तक

खोपोली : प्रतिनिधी

समाजाचे देणे लागतो, या भावनेतून खोपोली भाजप महिला मोर्चाच्यावतीने प्रकाशनगर भागातील गरीब वस्तीतील अंगणवाडी दत्तक घेऊन त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच खाऊ वाटप याद्वारे मदतीचा हात देत आहेत. अलीकडेच नवीन वर्षाचे औचित्य साधत अंगणवाडीतील महत्त्वाची कागदपत्रे व साहित्य ठेवण्यासाठी एक कपाट तसेच बसण्यासाठी चटई वाटपाचा कार्यक्रम अश्विनीताई पाटील (जिल्हा महिला मोर्चाचे अध्यक्ष) यांच्या उपस्थितीत शहर महिला मोर्चा अध्यक्षा शोभाताई काटे यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला खोपोली शहर भाजप अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, सरचिटणीस हेमंत नांदे, प्रमोद पिंगळे, त्याचप्रमाणे शहर महिला मोर्चा सरचिटणीस अश्विनी अत्रे, माजी नगरसेविका अपर्णा मोरे, उपाध्यक्ष अपर्णा साठे, सुमिता महर्षी ,कामगार आघाडीचे सूर्यकांत देशमुख, शहर भाजप चिटणीस गोपाळ बावस्कर, ओबीसी सेलचे सुनील नांदे, शहर युवा अध्यक्ष अजय इंगुलकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी अश्विनीताई पाटील यांनी आपले विचार मांडताना कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यासाठी गरीब वस्तीत जाऊन मदतीचा हात द्यावा, असे आवाहन केले. शोभाताई काटे यांनी सुरू केलेल्या उपक्रमाबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले. याच कार्यक्रमात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन करण्यात आले.

Check Also

पनवेल रेल्वेस्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल रेल्वेस्थानक परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे …

Leave a Reply