Breaking News

उरण बोकडविरा येथे वृद्ध महिलेची हत्या

उरण : प्रतिनिधी

उरण शहराजवळ असलेल्या बोकडविरा येथील वृद्ध विधवा महिलेची हत्या झाली आहे. ललिता ठाकूर (वय 64) असे या महिलेचे नाव असून त्या एकट्याच राहात होत्या. ललिता ठाकूर या बोकडविरा येथील खासगी शाळेत मोलमजुरी तसेच मालकीच्या तीनपैकी दोन खोल्या भाड्याने देऊन मिळणार्‍या उत्पन्नातून उपजीविका करीत होत्या. मंगळवारी (दि. 3) सकाळी शाळा उघडण्यासाठी चावी आणण्यास गेलेल्या कर्मचार्‍याला त्यांचे घर बंद दिसले. शेजार्‍यांनाही त्या दिसल्या नसल्याचे सांगण्यात आले. कुलूपबंद खोलीची खिडकी उघडली असता ही महिला जमिनीवर निपचित पडलेली दिसली. तिचे हातपाय रस्सीने करकचून बांधलेले होते. याबाबत माहिती मिळताच उरण पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. ललिताबाई यांच्याशी दोन दिवसांपूर्वी भाडोत्री अमोल सर्जेराव शेलार याचा वाद झाला होता. घटनेनंतर तो फरारी आहे. या वादातूनच खून झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply