छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्याचा पनवेलमध्ये निषेध
पनवेल ः रामप्रहर वृत्त
छत्रपती संभाजी महाराज यांच्याप्रती केलेल्या वक्तव्याबद्दल विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविरोधात पनवेल भाजपच्या वतीने मंगळवारी (दि. 3) आंदोलन करण्यात आले. या वेळी घोषणाबाजी करून निषेध केला गेला. पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या आंदोलनात माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी उपमहापौर सीताताई पाटील, चारुशीला घरत, भाजप शहराध्यक्ष जयंत पगडे, माजी नगराध्यक्ष सुनील घरत, संदीप पाटील, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, मुकीत काझी, मनोहर म्हात्रे, संतोष शेट्टी, समीर ठाकूर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सुशीला घरत,राजश्री वावेकर, वृषाली वाघमारे, हेमलता म्हात्रे, रूचिता लोंढे, नीता माळी तसेच ज्योती देशमाने, अंजली इनामदार, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, पनवेल शहराध्यक्ष रोहित जगताप, भाजप शहर खजिनदार संजय जैन, अमरीश मोकल, महिला मोर्चा शहराध्यक्ष वर्षा नाईक, सुहासिनी केकाणे, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, गौरव कांडपिळे, जितेंद्र तिवारी, सचिन पाटील, मयूर कदम, रूपेश नागवेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, त्यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे आहे, असे म्हटले होते. अजित पवार यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास माहिती नसणे ही गोष्ट दुर्दैवी आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजपकडून राज्यभर विविध ठिकाणी आंदोलन होत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांनी राष्ट्रधर्म, स्वधर्म आणि हिंदू धर्म या तीनही धर्मांचे रक्षण केले. त्यांना औरंगजेब धर्मांतर करायला सांगत होता, मात्र त्यांनी ते कधीच मान्य केले नाही. धर्मवीर संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे केले तरी त्यांनी स्वधर्म आणि स्वराज्याची भाषा सोडली नाही. अजित पवार आणि त्यांच्यासारख्या विचारांच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी छत्रपती संभाजीराजे हे स्वराज्यरक्षक होतेच, शिवाय ते धर्मवीरदेखील होते हे लक्षात ठेवावे, अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली तसेच अजित पवार यांनी माफी मागावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.