Breaking News

नावडे फेज 2मध्ये आमदार चषक क्रिकेट स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त
नावडे येथील जय हनुमान क्रिकेट क्लबच्या वतीने 5 ते 8 जानेवारीदरम्यान आमदार चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या नावडे फेज 2 येथील सिडको मैदानावर होणार्‍या या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते, तर बक्षीस वितरण पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे.
या वेळी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकार्‍यांची उपस्थिती असणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघास एक लाख रुपये व आकर्षक चषक, उपविजेत्यास 50 हजार रुपये व चषक  तसेच तृतीय आणि चतुर्थ क्रमांकास प्रत्येकी 25 हजार रुपये व आकर्षक चषक आणि मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांना बक्षिसे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेचा क्रिकेटप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्पर्धेचे आयोजक प्रशांत खानावकर व सहकार्‍यांनी केले आहे.

Check Also

पनवेल रेल्वेस्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल रेल्वेस्थानक परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे …

Leave a Reply