पाली सुधागडमध्ये संपाला प्रतिसाद; वीज कर्मचार्यांच्या मागण्या मान्य
पाली : प्रतिनिधी
महावीतरण कंपनीने पुकारलेल्या राज्यव्यापी संपात पाली सुधागडचे वीज कर्मचारी अभियंता मोठ्या संख्येने सहभागी झाले. परिणामी पाली विजवीतरण कार्यालय बंद आहे. अदानी इलेक्ट्रिकल कंपनीने महावितरण कंपनीच्या विभागात समांतर वीजपुरवठा करण्याची परवानगी मिळवण्यासाठी वीज नियामक आयोगाकडे अर्ज केला आहे. मागितलेल्या परवान्यासमहानिर्मिती, महापारेशण व महावितरणचा तीव्र विरोध असून अदानी कंपनीला समांतर वीज वितरणाचा परवाना देण्यात येऊ नये अशा विविध मागण्यांसाठी 3 दिवसाचा संप 3 जानेवारी रोजी रात्री 12 वाजल्यापासून पुकारला आहे. हा संप 6 जानेवारीपर्यंत चालणार असून पाली सुधागड विजवीतरण विभागाचे सर्व कर्मचारी, अभियंता, अधिकारी यामध्ये सहभागी झाले आहेत.पाली येथील विजवीतरण कार्यालय बंद आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी, समस्या जैसे थे राहणार आहेत. सलग तीन दिवसांच्या पुकारलेल्या संपाला सर्वत्र प्रतिसाद मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील सुधागडसह अन्य तालुक्यातील वीज कंपनी कर्मचार्यांनी संप पुकारला आहे. संप असला तरी सुधागड तालुक्यातील वीज पुरवठ्यावर कोणताही परिणाम झाला नाही. वीज अधिका-यांसह कर्मचार्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे त्यांच्या कोणत्याही आर्थिक मागण्या नाहीत तर नागरिकांच्या मालकीचा वीज उद्योग टिकला पाहिजे तो भांडवलदारांना विकता कामा नये, भांडवलदार नफा कमविण्याच्या उद्येशाने वीज वितरण क्षेत्रात येत आहेत, असा दावा येथील कर्मचारी यांनी केला. वीज वितरण परवाना मिळविण्यासाठी अदानी वीज कंपनीने राज्य वीज नियामक आयोगाकडे अर्ज केला आहे. अदानी कंपनीला वीज वितरण परवाना मिळण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. मात्र, महावितरण कंपनीला चांगले उत्पन्न मिळत असलेली किंवा वीजबिल वसुलीचे प्रमाण चांगले असलेले विभाग खासगी वीज कंपनीकडे जातील आणि महावितरण कंपनी आणखी आर्थिक अडचणीत सापडून शासकीय वीजकंपन्यांचे खासगीकरण होईल, तरी अदानी वीज कंपनीला वितरण परवाना देऊ नये, अशी मागणी आम्ही आमच्या आंदोलनातून करत आहोत. असे पाली सुधागड विजवीतरणचे उपअभियंता जतीन पाटील यांनी सांगितले. राज्य सरकारने वीज कर्मचार्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर संप मागे घेत सर्वांनी समाधान व्यक्त केले.
संप यशस्वी
या संपात अभियंता, वीज कर्मचारी यांचा मोठा सहभाग दिसून येतोय, तसेच जिल्ह्यासह राज्यभरात संघर्ष समिती, इंजिनीयर संघटना, वर्कर फेडरेशन, कंत्राटी कामगार महासंघ, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ, तांत्रिक कामगार युनियन,आदींच्या सहभागाने तीन दिवशीय संप यशस्वी होईल, असा विश्वास संपकरी व्यक्त करत आहेत.