अलिबाग : प्रतिनिधी
राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक पाचवी व माध्यमिक आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये दोन्ही वर्गातील 717 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.
जिल्ह्यात पाचवीच्या वर्गातील सात हजार 150 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी सहा हजार 522 विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. त्यापैकी एक हजार 258 विद्यार्थी पात्र ठरले असून 375 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. आठवीच्या वर्गातील पाच हजार 82 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी चार हजार 692 विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले होते. यातील 518 विद्यार्थी पात्र ठरले, तर 342 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.
दरम्यान, शिक्षण विभागाच्या वतीने शाळा स्तरावर विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेसह खासगी शाळांमधील या परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे. सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.
Check Also
आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत
पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …