पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलचे क्रीडाप्रेमी आमदार प्रशांत ठाकूर संस्थापक अध्यक्ष असलेल्या नितळस येथील छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय कुस्ती संकुलातील आठ कुस्तीपटूंची पुणे येथे 10 जानेवारीपासून सुरू होणार्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी नयन रवींद्र पाटील (48 किलो वजनी गट), सुशांत नामदेव पाटील (60 किलो), आदित्य भास्कर मढवी (65 किलो), साजन चाहू पावशे (61 किलो), महेंद्र काशिनाथ म्हात्रे (61 किलो), विकास जयराम पावशे (92 किलो), विकास जगन्नाथ वालिलकर (79 किलो) आणि पवन ईश्वर पावशे (45 किलो) याची, तर पवन ईश्वर पावशे याची सातारा येथे होणार्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी 45 किलो वजनी गटातून निवड झाली आहे.
निवड झालेले सर्व खेळाडू छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय कुस्ती संकुलात राष्ट्रीय पैलवान वस्ताद रूपेश पावशे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. यासाठी मारुती पावशे, शरद पावशे, बाळाराम काटे, संतोष गोंधळी, नामदेव पाटील, वावंजे गावचे सरपंच डी. बी. म्हात्रे व ग्रामस्थ मंडळ यांचे सहकार्य लाभत आहे.
दरम्यान, कुस्तीपटूंची मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड झाल्याने त्यांचे छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय कुस्ती संकुलाचे संस्थापक अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
Check Also
अलबेला @ ७५ वर्षे भोली सुरत दिल के खोटे….
काही चित्रपट चित्रपटगृहातून उतरतात, काळ पुढे सरकत राहतो, बराच पुढे सरकतो. चित्रपट रसिकांच्या किमान तीन …
RamPrahar – The Panvel Daily Paper