खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. अशाच एका खाद्य महोत्सव व स्पर्धांचे आयोजन महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे सोमवारी (दि. 9) करण्यात आले होते.या स्पर्धेचा व खाद्य महोत्सवाचा मुख्य उद्देश वेगवेगळे वनस्पतींचा वापर करून खाद्य पदार्थ बनवणे हा होता. या खाद्य महोत्सव व स्पर्धेमध्ये सुमारे 20 विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या वनस्पतींचा वापर करून वेगवेगळे खाद्य पदार्थ बनवले होते. प्रस्तुत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड यांनी या महोत्सवाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी बनवलेल्या खाद्यपदार्थांची पाहणी करून विद्यार्थ्यांची स्तुती केली.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. नमिता आखुरे या उपस्थित होत्या. या स्पर्धेमध्ये भाग्यश्री – बीटची इडली (एफवाय बीएससी) व मेहुल- पालक ढोकळा (एफवाय बीएससी), सुनीता – कोरफडीतील पान (एफवाय बीएससी) व प्रमिला- औषधी पाणी (एफवाय बीएससी) हे सर्व विद्यार्थी विजयी झाले. या स्पर्धेचे आयोजन प्रा. डॉ. शुभांगी वास्के यांनी केले तसेच प्रा. महेश्वरी झिरपे (समन्वयक अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष) व प्रा. सफीना मुकादम, इतर प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.
स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. सिद्धेश्वर गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले व पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.
Check Also
पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …