आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
खारघर : रामप्रहर वृत्त
यु नारायण फाउंडेशन आणि अटल फाउंडेशन यांच्या वतीने खारघर सेक्टर 19 येथे मनोज. बी. पाटील यांनी आयुर्वेदिक आरोग्य केंद्र सुरू केले आहे. या केंद्राचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 8) झाले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मनोज.बी.पाटील यांचं अभिनंदन करत त्यांना पुढील यशस्वी वाटचाली करीत शुभेच्छा दिल्या. दरम्यान, या केंद्राच्या उद्घाटनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून याला उत्तर प्रतिसाद लाभला. या वेळी भाजपचे खारघर तळोजा मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, प्रवीण पाटील, माजी नगरसेविका नेत्रा पाटील, अनिता पाटील, डॉक्टर प्रदीप चौधरी, अॅड. मयूरा मारू, प्रेम नारायण, मनोज राजपूत, नवनीत पुरषोत्तम मारू, जे. जे.पिंगळे, जितेंद्र मिस्त्री आदी उपस्थित होते.
Check Also
भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …
RamPrahar – The Panvel Daily Paper