Breaking News

दिविल ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अन्याय

पोलादपूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या दुसर्‍या टप्प्यातील निवडणुका झाल्यानंतर प्रकर्षाने पुढे आलेली गोष्ट म्हणजे खातेपिते खाते या स्वरूपात निवडणूक विभागाकडे पोलादपूर तहसिलदारांचा दृष्टीकोन आहे. पोलादपूर तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये महिला तहसीलदारांना गेल्या चार पाच वर्षांपासून तालुका दंडाधिकारी पदावरून बेकायदेशीररित्या हितसंबंध जोपासण्याची संधी प्राप्त झाली आहे. पर्यायाने लोकशाहीची खुलेआम मुस्कटदाबी सुरू असल्याचे दिसून आले आहे. ही घटना तालुक्यातील दिविल ग्रामपंचायतीच्या निवडणुकीदरम्यान स्पष्ट झाली आहे. पोलादपूर तालुक्यातील दिविल ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या दोन माजी पदाधिकारी असलेल्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी विरूध्द बाळासाहेबांची शिवसेना अशा लढतीमध्ये स्वाभाविकपणे राज्याच्या राजकारणात भाजपसोबत बाळासाहेबांची शिवसेना असल्याने दोन जागा सोडण्याची मागणी केली होती. या मागणीला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यकर्ते नेते आणि आमदारांनीही धूप न घातल्याने प्रभाग एकमधून या दोन्ही कार्यकर्त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. यानुसार मंगेश देवलिंग जंगम आणि सुवर्णा भाऊ भिलारे या दोन उमेदवारांनी प्रचारामध्ये आघाडी घेऊन निवडणूक लढवित स्वाभिमान उघड केला. 18 डिसेंबरला मतदान होऊन 20 डिसेंबरला मतमोजणी झाली. यावेळी दिविल ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सागर देवे (390 मते विजयी) यांनी थेट लढतीत प्रतिस्पर्धी उमेदवार गोपाळ चांढविकर (352 मते) यांचा पराभव केला. प्रभाग 1 मध्ये 3 जागांसाठी मंगेश जंगम (189 मते विजयी), रंजना देवे (211 मते विजयी), सुवर्णा भिलारे (171 मते विजयी) हे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग 2 मध्ये विक्रम भिलारे (88 मते विजयी), सविता कदम (103 मते विजयी) हे विजयी झाले. प्रभाग 3 मध्ये अनिता भिलारे(102 मते विजयी)आणि नयन सुतार (115 मते विजयी)हे विजयी झाले असल्याची आकडेवारी पोलादपूर तहसीलदार कार्यालयातील निवडणूक तहसिलदार देसाई यांच्या ऐवजी अन्य एका महिला कारकूनाने प्रसिध्दी माध्यमांना दिली. यासाठी त्यांनी पोलादपूर तहसिल कार्यालयातील निवडणूक विभागाच्या दिविल ग्रामपंचायतीच्या निकालाच्या जोडपत्र 21 नुसार सर्वसाधारण स्त्री आरक्षणाच्या तीन महिला उमेदवारांपैकी क्रमांक दोनच्या सुवर्णा भाऊ भिलारे यांना एकूण मते 344 पैकी 171 मते प्राप्त झाल्याने त्या विजयी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर क्रमांक एकच्या उमेदवार रूपाली तुषार पवार यांना 25 मते तर क्रमांक 3च्या मनिषा निलेश शिंदे 146 आणि नोटा मते 02 अशी आकडेवारी दिसून येत आहे. याच प्रभाग 1 मधील अनुसुचित जाती आरक्षणासाठीच्या सदस्यासाठी झालेल्या निवडणुकीतील क्रमांक 1 चे उमेदवार जंगम मंगेश देवलिंग यांना एकूण मते 344 पैकी 189मिळाल्याचे जाहिर करून विजयी घोषित करण्यात आले आहे. याच प्रभागातील क्रमांक 2 चे उमेदवार मोरे प्रमोद चंद्रकांत यांना 09 आणि क्रमांक 3चे उमेदवार सविता सदाशिव सोनावणे यांना 145 तसेच नोटा मते 01 अशी असल्याचे दिविल ग्रामपंचायतीच्या निकालाच्या जोडपत्र 21 नुसार निवडणूक निकाल जाहिर करण्यात आला आहे. या निकालाखाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज करणारे पोलादपूर पंचायत समितीचे कृषी अधिकारी वसावे यांची स्वाक्षरी केलेली आहे. जोडपत्र 21 नुसार जाहीर झालेल्या निवडणूक निकालाच्या पुढील प्रक्रियेनुसार निवडणूक निर्णय अधिकारी यांचे निवडणूक निकाल जाहिर करण्याचे पत्र 16 बदलण्यात आले असून निवडून आलेलया उमेदवारांची माहिती उपोदघात क्रमांक 2 व 3 नुसार रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात आली. उपोदघात क्रमांक 4 नुसार ग्रामपंचायत निवडणूक निकाल प्रसिध्द करायचा असून सदरचा अधिकार जिल्हाधिकारी यांना उपोदघात क्रमांक 5 नुसार प्राप्त असल्याने जिल्हाधिकारी रायगड यांच्या 23 डिसेंबर 2022 रोजीच्या पत्रामध्ये दिविल ग्रामपंचायतीच्या निवडून आलेल्या सरपंच आणि सदस्यांची माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे. या पत्रानुसार, दिविल सरपंच सागर सखाराम देवे, सदस्यपदी प्रमोद चंद्रकांत मोरे, रंजना चंद्रकांत देवे, रूपाली तुषार पवार, विक्रम विष्णू भिलारे, सरिता राजेंद्र कदम, नयन विजय सुतार, अनिता नामदेव भिलारे यांची माहिती प्रभाग, आरक्षण आणि नावानिशी प्रसिध्द करण्याचा अधिकार रायगड जिल्हाधिकारी यांना उपोदघात क्रमांक 5 नुसार बजावला आहे. दरम्यान, 2 जानेवारी 2023 रोजी दिविलमध्ये उपसरपंच पदाची बिनविरोध निवड होऊन महाविकास आघाडीचे प्रमोद मोरे यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. दिविल ग्रामपंचायतीच्या निकालाच्या जोडपत्र 21 नुसार प्रभागातील क्रमांक 2 चे उमेदवार मोरे प्रमोद चंद्रकांत यांना 9 मते मिळाल्याचे दिसून येत आहे आणि मतमोजणीवेळी जाहिर झालेल्या जोडपत्र 21 मध्ये प्रभाग 1 मधील अनुसुचित जाती आरक्षणासाठीच्या सदस्यासाठी झालेल्या निवडणुकीतील क्रमांक 1 चे उमेदवार जंगम मंगेश देवलिंग यांना एकूण मते 344 पैकी 189मिळाल्याचे जाहिर करून विजयी घोषित करण्यात आले आहे. जोडपत्र 21 नुसार याच प्रभागातील सर्वसाधारण स्त्री आरक्षणाच्या तीन महिला उमेदवारांपैकी क्रमांक दोनच्या सुवर्णा भाऊ भिलारे यांना एकूण मते 344 पैकी 171 मते प्राप्त झाल्याने त्या विजयी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर क्रमांक एकच्या उमेदवार रूपाली तुषार पवार यांना 25 मते पडल्याचे दिसून येत आहे. यावरून जे उमेदवार विजयी उमेदवाराच्या मतांच्या तब्बल दीडशेहून अधिक मतांनी पिछाडीवर राहून अनामत रक्कमा गमावित पराभूत झाले आहेत. नेमक्या त्याच दोन उमेदवारांना पोलादपूर तहसीलदार कार्यालयाने जिल्हाधिकार्‍यांना पाठविलेल्या पत्र 16नुसार विजयी घोषित केल्याने भाजपच्या जोडपत्र 21 नुसार विजयी झालेल्या दोन्ही कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण होऊन दोन्ही उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी विश्वास नलावडे यांनी आज गुरूवार दि. 12 जानेवारी 2023 पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. पोलादपूर तहसीलदारांनी यासंदर्भात कोकण विभागीय शिक्षक मतदार संघाची निवडणूक आदर्श आचारसंहिता असल्याचे कारण देऊन आमरण उपोषणास परवानगी नाकारली आहे. प्रत्यक्षात ग्रामपंचायत निवडणुकीसाठीची आचारसंहिता संपुष्टात आली नसताना पोलादपूर तहसीलदारांनी पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या महाविकास आघाडी आणि बाळासाहेबांची शिवसेनेचे आमदार भरत गोगावले समर्थकांचे जे दोन उमेदवार निवडणूक निकाल जोडपत्र 21 नुसार पराभूत असल्याची नोंद निवडणूक निर्णय अधिकारी वसावे यांनी जोडपत्रातून मतमोजणीवेळी केली आहे, अशांनाच विजयी घोषित करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना पत्र 16 नुसार माहिती बदलून पाठविल्याने आचारसंहितेचा भंग झाला आहे. याप्रकारची माहिती बदलून पाठविण्यासंदर्भात मोरे प्रमोद चंद्रकांत यांचा अथवा रूपाली तुषार पवार यांचा कोणताही आक्षेप नसताना अशाप्रकारे निकालात बदल करण्याचा अधिकार तहसिलदार पोलादपूर यांना तालुका दंडाधिकारी म्हणून प्राप्त आहे अथवा कसे याची स्पष्टता न केल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जोडपत्र 21 मध्ये विजयी घोषित केलेले भाजपचे दोन्ही उमेदवार पराभूत झाल्याचे जाहीर न करताच अचानक पराभूत उमेदवारांना विजयी उमेदवारांच्या यादीमध्ये समाविष्ठ करण्याचा प्रकार अन्याय्य नक्कीच आहे. जोडपत्र 21 नुसार जाहीर झालेल्या निवडणूक निकालाच्या पुढील प्रक्रियेनुसार निवडणूक निर्णय अधिकारी यांचे निवडणूक निकाल जाहीर करण्याचे पत्र 16 बदलण्यात आले असून निवडून आलेल्या उमेदवारांची माहिती उपोदघात क्रमांक 2 व 3 नुसार रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात आली. उपोदघात क्रमांक 4 नुसार ग्रामपंचायत निवडणूक निकाल प्रसिध्द करायचा असून सदरचा अधिकार जिल्हाधिकारी यांना उपोदघात क्रमांक 5 नुसार प्राप्त असल्याने जरी हा निकाल बदलला असला तरी जोडपत्र 21 मधील निवडणूक निर्णय अधिकारी वसावे यांनी मतमोजणीच्या दिवशी जाहिर केलेल्या निकालाला कोणाचीही हरकत नसून तो निकाल रद्द न करताच बदलण्याचा प्रकार झाला.

जाहीर झालेल्या निकालामध्ये झेडछाड

ग्रामपंचायतीच्या निवडणूका पक्षचिन्हाविनाच लढल्या जात असताना पोलादपूर तालुक्यातील दिविल ग्रामपंचायतीमध्ये जोडपत्र क्रमांक 21 नुसार जाहिर झालेल्या निकालामध्ये विनाआक्षेप बदल करण्याचा प्रकार प्रशासन आणि पुढार्‍यांनी लोकशाहीविरोधात छेडलेले युध्द असून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असलेल्या दोन्ही उमेदवारांना कोठेही पराभूत घोषित न करताच मा. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विजयी घोषित करण्याच्या उपोदघात क्रमांक 5 नुसार प्राप्त अधिकारात बदलण्याचा प्रकार लोकशाहीला मारक ठरणारा आहे.

  • शैलेश पालकर

Check Also

शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी साता समुद्रापार -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी नाव हे साता समुद्रापार पोहचले असून या सुसज्ज …

Leave a Reply