Monday , February 6 2023

नेरळ दहिवली गावात दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा देखावा

कर्जत : बातमीदार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे यासाठी प्रकल्पग्रस्त ठाम आहेत. भूमिपुत्र ‘दिबा’ यांच्या नावाचा आग्रह राज्य शासनाने मान्य करावा, यासाठी नेरळ-कळंब रस्त्यावरील

दहिवली गावातील भवारे बंधू यांनी गणेशोत्सवामध्ये सजावट केली आहे.

कर्जत तालुक्यात नेरळ दहिवली येथे भवारे कुटुंबाने गणपतीची सजावट म्हणून शेतकरी आपली शेती करतानाचा देखावा सादर केला आणि नंतर तिच जमीन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात आली. या शेतकर्‍यांना साडेबारा टक्के विकसित जमीन देण्यास दि. बा. पाटील यांनी शासनाला भाग पाडले होते. म्हणून नवी मुंबईतील जमिनीवर उभारण्यात येणार्‍या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी पुढे येत आहे. नेरळ दहिवली गावातील गणेशभक्त अशोक भवारे, यशवंत भवारे, मिलिंद भवारे या तिघांनी मिळून दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असा फलक असलेला देखावा साकारला आहे.

गणपती बाप्पा महाराष्ट्र सरकारला सुबुद्धी देवो आणि नवी मुंबई विमानतळाला नाव दि. बा. पाटील हेच दिले जावे, हाच सदर देखावा साकारण्याचा मुख्य उद्देश असल्याचे भंवारे कुटुंबियांनी सांगितले.

 भवारे कुटुंबाच्या या घरगुती गणपतीला यंदा 70 वर्षे पूर्ण झाली असून, बाळीराम भवारे यांचा हा नवसाचा  गणपती बाप्पा आहे.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply