Breaking News

महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना विजयी करा

आमदार प्रशांत ठाकूर यांचे शिक्षकांना आवाहन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ नवीन पनवेल येथील विविध शाळांमध्ये सभांचे आयोजन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या वेळी त्यांनी शिक्षकांशी संवाद साधत म्हात्रे सरांना या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन केले. या प्रचार सभांना पनवेलच्या माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, स्थायी समितीचे माजी सभापती संतोष शेट्टी, माजी नगरसेवक समीर ठाकूर, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, भापज युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्यासह पदाधिकारी आणि शिक्षक उपस्थित होते. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. ते स्वत: शिक्षक असून मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या अडी-अडचणी दूर करण्यासाठी वेळोवेळी धाव घेतलेली आहे. त्यामुळे शिक्षकांची उमेदवार म्हात्रे यांच्याविषयी आपलेपणाची भावना दिसून येते. याचे प्रतिबिंब निकालात पहावयास मिळेल, असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करीत आहेत. दरम्यान, या निवडणुकीसाठी येत्या 30 जानेवारीला मतदान, तर मतमोजणी 2 फेब्रुवारीला होणार आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply