पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. या अंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहरच्यावतीने शालेय वस्तू वाटप कार्यक्रम सोमवारी आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहून पनवेल महापालिकेच्या लोकनेते दि.बा.पाटील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमीत्त कोणतेही पुष्पगुच्छ तसेच जाहीरात न देता सामाजिक उपक्रम राबवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार पनवेल महापालिकेच्या लोकनेते दि.बा.पाटील विद्यालयात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी नगरसेविका दर्शना भोईर, कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव संजय भगत, भाजप नेते श्रीनंद पटवर्धन, पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंझारराव, सरचिटणीस अमित ओझे, केदार भगत, रूपेश नागवेकर, रोहित जगताप, प्रशांत शेट्टे, देवांशू प्रभाळे, अक्षय सिंग, आकाश गाडे, जयेश चव्हाण, जयेश घरत, अखिलेश पाटील, निखील घरत, अर्जून भगत, अनिमेश ओझे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
Check Also
गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा
उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …
RamPrahar – The Panvel Daily Paper