शालेय विद्यार्थ्यांना स्वखर्चातून शूज व सॉक्सचे वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्त
विद्यार्थ्यांनी थोर व्यक्तींच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी व आपले जीवन यशस्वी करावे, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 24) केले.
‘रयत’चे गव्हाण कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेज तसेच जेबीएसपी संस्थेच्या मोरू नारायण म्हात्रे विद्यालय व तु. ना. घरत ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वतीने आठ लाख 70 हजार रुपये किमतीच्या शालेय शूज व सॉक्सचे वितरण विद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. त्या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर अध्यक्षस्थानावरून बोलत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेस प्रोत्साहन देण्यासाठी विविध पारितोषिकांसाठी 10 लाख रुपयांचा धनादेश कायम ठेवीसाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सुपूर्द केल्याचे विद्यालयाच्या प्राचार्य साधना डोईफोडे यांनी प्रास्ताविकात सांगितले.
या वेळी उलवे नोड उत्तर भारतीय महिला मोर्चाच्या अर्चना मिश्रा यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या दातृत्व आणि कार्यकुशलतेबद्दल गौरवोद्गार काढले.
या कार्यक्रमास श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी व समन्वय समिती सदस्य तथा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन भार्गवशेठ ठाकूर, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंताशेठ ठाकूर व विश्वनाथ कोळी, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष व माजी पं.स. सदस्य रत्नप्रभा घरत, वसंतशेठ पाटील, वामनशेठ म्हात्रे, भाऊ भोईर, अंकुश ठाकूर, किशोर पाटील, कमलाकर देशमुख, रघुनाथ देशमुख, अर्चना मिश्रा, सुधीर ठाकूर, नामदेवशेठ ठाकूर, राजेंद्र देशमुख, मदन पाटील, मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाच्या प्राचार्य प्रणिता गोळे, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक प्रमोद मंडले, पर्यवेक्षिका विशाखा मोहिते, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य रवींद्र भोईर व प्रमोद कोळी, लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर, ज्युनिअर कॉलेजचे विभाग प्रमुख प्रा. बाबुलाल पाटोळे यांच्यासह शिक्षक व दोन्ही विद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर रंधवे यांनी केले.